वादामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होत नाही – राहुल

November 22, 2008 2:32 PM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर दिल्लीराजधानी दिल्लीत सध्या हिंदुस्तान टाईम्स आणि सीएनएन आयबीएनचा लीडरशिप समिट सोहळा चालू आहे. या समिटमध्ये अनेक मान्यवरांची भाषणे होत आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये सीनियर ज्युनियर वादावर नेहमीच चर्चा होत असते, पण प्लेअर्सवर मात्र त्याचा जास्त परिणाम होत नसल्याचं भारतीय क्रिकेट टीमचा द वॉल राहुल द्रविड यानं यावेळी सांगितलं. हा वाद काही नवा नाही. यापूर्वीही हा वाद होताच. असं पाच वर्षापूर्वीही झालं होतं आणि दहा वर्षापूर्वीही.मला वाटत हे खेळाडंूच्या कामगिरीवर आणि निवडसमितीला कोणते खेळाडू हवे आहेत यावर अवलंबून असतं. तुम्ही बराच काळ चांगली कामगिरी करत असाल तर असा वाद निर्माण होतंच नाही असं राहुल पुढे म्हणाला. काहीही असो आम्हाला अशा आव्हानांची सवय आहे.

close