रेल्वे बजेटवर ममतादीदी नाराज

March 14, 2012 10:06 AM0 commentsViews: 2

14 मार्च

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी सादर केलेल्या रेल्वे बजेटवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. त्रिवेदी यांनी केलेल्या दरवाढीवर ममता बॅनर्जी यांनी नाराजी दर्शवली. रेल्वेची भाडेवाढ करण्यापूर्वी त्रिवेदी यांनी कुठलीही चर्चा केली नव्हती, असं मत प्रदर्शित करत ममता बॅनर्जी यांनी ही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, भाडेवाढ करण्याचा निर्णय माझा होता त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिनेश त्रिवेदी यांनी दिले आहे.

close