विधानसभेत गाजला शिवस्मारकाचा मुद्दा

March 15, 2012 9:45 AM0 commentsViews: 8

15 मार्च

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी शिवस्मारकाचा विषय गाजला. शिवस्मारकाबाबतची सरकारने आपली भुमिका बदलली आहे. पर्यावरण खात्याने शिवस्मारकाला परवानगी नाकारली नसून मधल्या काळात योग्य फॉलोअप झाला नाही त्यामुळे आता केंद्र सरकारशी बोलणी करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात दिलंय. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात शिवस्मारकावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाने त्यात आणखी भर घातली. शेवटी विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दोन दिवसात सरकारने भुमिका स्पष्ट करावी असे निर्देश सरकारला दिले आहे.

close