टीम इंडियाचा उद्या बांगलादेशशी मुकाबला

March 15, 2012 4:33 PM0 commentsViews: 1

15 मार्च

एशिया कपमध्ये विजयी सलामी दिल्यानंतर भारतीय टीम आता बांगलादेशला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. मिरपूरमध्ये उद्या दोन्ही टीम आमनेसामने येतील. भारताच्या बॅट्समननी शानदार बॅटिंगचा नमुना लंकेविरूद्ध दाखवलाच आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहलीने दमदार सेंच्युरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर धोणी आणि रैनाने भारतीय इनिंगचा शेवट गोड केला होता. तर भारताच्या बॉलर्सनीही चांगली कामगिरी करत लंकेला वेसण घातली होती. त्यामुळे आता बघायचय की धोणी टीममध्ये काही बदल करतो की तीच टीम कायम ठेवतो.

close