ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

March 15, 2012 4:41 PM0 commentsViews: 2

15 मार्च

मुंबईतील ताडदेव परिसरातल्या या तीन मजली गणपत सदन या बिल्डिंगला आज सकाळी आग लागली. या आगीत 14 जण जखमी झाले असून अरविंद फणसेकर या नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत जखमी झालेल्या चौदा लोकांना नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन फायर ब्रिगेडचे जवान आणि एक पोलीस काँस्टेबलचा समावेश आहे.

close