दारुच्या 500 बाटल्या आणणारे 14 पोलीस निलंबित

March 15, 2012 4:59 PM0 commentsViews: 3

15 मार्च

गोव्यातून कर चुकवून दारूच्या 500 बाटल्या आणणारे नवी मुंबईतील 14 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या पोलिसांवर कारवाईचे आदेश दिले. यात एक आयपीआय आणि तीन आयएसआय यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील हे पोलीस रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन गोव्यात गेले होते. परतत असताना त्यांनी आपल्या गाड्यांमध्ये दारूच्या 500 बाटल्या सोबत घेतल्या होत्या. तपासणीदरम्यान पोलिसांनी या बाटल्या जप्त केल्या आहेत. आणि या पोलिसांना उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय.

close