रेल्वेमंत्री राजीनामा देण्यास तयार

March 17, 2012 9:15 AM0 commentsViews: 6

17 मार्च

रेल्वे प्रवासात भाडे वाढ करून आपल्याच पक्षाची नाराजी ओढवावून घेणारे रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी राजीनामा द्यावाच अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी लावून धरली आहे. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांच्याशी चर्चा केली . त्यांनी त्रिवेदींना राजीनामा देण्याबद्दल सांगितलं. पण राजीनामा देण्याबद्दल आपल्याला लेखी पत्र मिळालं पाहिजे असं त्रिवेदी यांचं म्हणणं आहे. आपण एक ते दोन दिवसात पद सोडायला तयार आहोत. पण त्याबद्दल आपल्याला पक्षाकडून लेखी पत्र मिळालं पाहिजे, असं त्रिवेदी यांनी आएबीएन नेटवर्कशी बोलताना स्पष्ट केलंय.

close