नोकरदारांना फटका ; प्रॉव्हिडंट फंडच्या व्याजदरात कपात

March 15, 2012 5:46 PM0 commentsViews: 4

15 मार्च

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला नोकरदार वर्गासाठी वाईट बातमी आहे. प्रॉव्हिडेंट फंडच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पुर्वी हा व्याजदर साडे नऊ टक्के होता. तो सव्वा आठ टक्के करण्यात आला आहे. म्हणजे तब्बल सव्वा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कपात आहे. या व्याज दर कपातीचा फटका देशभरातल्या जवळपास पाच कोटी नोकरदारांना बसणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही व्याजदर कपात सुचवली आणि कामगार मंत्रालयाने त्यासाठीचं नोटीफिकेशन जारी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

close