मुरबाडच्या 27 विद्यार्थ्यांना विषबाधा

March 17, 2012 9:31 AM0 commentsViews: 8

17 मार्च

मुरबाडमधल्या पशेनी गावातल्या असणार्‍या नेटलूर टेक्निकल ट्रेनिंग फाऊंडेशन महाविद्यालयातील 27 विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मेसमधल्या जेवणातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुरबाडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 5 जणांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना कल्याणच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

close