सराफ बाजार 3 दिवस राहणार बंद

March 17, 2012 9:48 AM0 commentsViews: 7

17 मार्च

काल बजेटमध्ये सोने आणि सोन्याच्या दागिन्यावरील करात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने 3 दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात पुढील 3 दिवस सराफ बाजार बंद राहणार आहेत. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या सराफ संघाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि दुकानं बंद ठेवली आहेत तर नाशिकमध्ये सुद्धा सराफ बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. नाशिक सराफ असोसिएशनं या बंदला पाठिंबा दिला आहे.

close