ज्योतीकुमारी बलात्कार आणि खुनप्रकरणी दोन्ही आरोपी दोषी

March 17, 2012 2:15 PM0 commentsViews: 1

17 मार्च

पुण्यात हिंजवडी भागात कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या तरुणीचा बलात्कार आणि खुनप्रकरणी दोन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. या आरोपींना सोमवारी शिक्षा ठोठावली जाणार आहे. ज्योतीकुमारी चौधरी या कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या तरुणीवर बलात्कार करुन त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पुरूषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकाटे या आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. आज या प्रकरणाची पुणे कार्टात अंतिम सुनावणी झाली. विप्रो कंपनीच्या कॉलसेंटरमध्ये त्या काम करत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी कॅबचालक पुरूषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडे यांना अटक केली होती. या दोघांनीही नंतर गुन्ह्याची कबुली दिली होती. तळेगाव दाभाडे येथील गहुंजे गावाच्या हद्दीत हा प्रकार घडला होता.

close