नरेंद्र मोदींची लवासाला भेट

March 17, 2012 3:19 PM0 commentsViews: 3

17 मार्च

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज लवासाची पाहणी करत आहे. तीथल्या एका शाळेचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार असून मोदी लवासातच आज मुक्कामही करणार आहेत. लवासा कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अजित गुलाबचंदही नरेंद्र मोदींसोबत आहेत. प्रदेश भाजपने सातत्याने लवासा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मोदींच्या लवासा भेटीमुळे प्रदेश भाजपच्या नेते आता कुठली भुमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. लवासा कॉर्पोरेशन गुजरातमध्येही एक हिल स्टेशन विकसित करणार आहे.

close