पवारांचं राजकारण हिणकस – बाळासाहेब

March 17, 2012 6:00 PM0 commentsViews: 12

17 मार्च

शरद पवार नावाचा माणूस हा एकीकडे खुळखुळा वाजवतो आणि दुसरीकडे मित्रत्वाचा गळा घोटतो अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. तसेच पवार नेहमी गॉस्पी खेळत असतात. तिकडे नाशिकमध्ये जो डाव टाकला आहे तो अत्यंत हिणकस आहे. आम्हाला कोणाचे उपकार नको आहेत पण ज्यापध्दतीने तुम्ही वागत आहात त्याला मी उत्तर देणार असा इशारा बाळासाहेबांनी पवारांना दिला. मुंबई, ठाणे महापालिकेतल्या विजयाचा आनंद शिवसेनेनं अंधेरीतल्या शहाजीराजे स्पोर्ट्स क्लबमध्ये आज दणक्यात साजरा केला. यावेळी बाळासाहेबांची व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्यानंतर आज शिवसेनेनं मोठ्या दणक्यात विजयोत्सव अंधेरीतल्या शहाजीराजे स्पोर्ट्स क्लबमध्ये साजरा केला. कोणत्याही 'ऍवॉर्ड शो' ला लाजवेल असा दिमाखदार सांस्कृतिक सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि युवराज आदित्य ठाकरे यांची एंट्री विशेष क्रेनच्या साह्याने स्टेजवर झाली. आगमन झाल्यावर दोघांनीही शिवसैनिकांना दंडवत घातला. शिवसेनेचा हा दिमाखदार सोहळा पाहुन उपस्थित शिवसैनिकांचे डोळे दिपून गेले. आणि याही पेक्षा खरीवेळ आली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची. या कार्यक्रमाला बाळासाहेब उपस्थित राहु शकले नाही पण नेहमीप्रमाणे एका व्हिडिओ सीडीव्दारे बाळासाहेबांचा संदेश दाखवण्यात आला. विजयोत्सव झाला पाहिजे पण हा मेळावा आपण आपल्या मेहनती, ताकदीवर मिळवलेल्या विजयामुळे आहे. प्रणव मुखर्जी यांनी बजेट सादर केले पण सर्व काही बट्याबोळच आहे. तिकडे तो शरद पवार नावाचा माणूस हा मित्रत्वाचा खुळखुळा वाजवतो, आणि गळा दाबतो मैत्री जरुर आहे मैत्री जरी असली तरी ते परखडपणेच बोलतात पण आमचा हा हल्ला प्रवृत्तीवर आहे. असा ठाकरी टोला बाळासाहेबांनी लगावला. तसेच पवार नेहमी गॉस्पी खेळत असतात. तिकडे नाशिकमध्ये जो डाव टाकला आहे तो अत्यंत हिणकस आहे. आम्हाला कोणाचे उपकार नको आहेत पण ज्यापध्दतीने तुम्ही वागत आहात त्याला मी उत्तर देणार आहे असा इशारा बाळासाहेबांनी पवारांना दिला.

close