युवीला रुग्णालयातून सोडले

March 18, 2012 9:19 AM0 commentsViews: 2

१८ मार्च

भारताचा स्टार फटकेबाज बॅटसमन युवराज सिंगने अखेर कॅन्सरची मॅच जिंकली आहे. केमोथेरपीची शेवटची आणि तिसरी प्रक्रीया य़शस्वी पूर्ण झाली असून युवीला हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती खुद्द युवीने टिवटरवर दिली आहे.

जानेवारी महिन्यापासून युवराज अमेरिकेतील बॅास्टन इंस्टिट्यूट अॅाफ कॅन्सर रिसर्च येथे उपचार घेत आहे. फुफ्फुस आणि ह्रदयामध्ये ट्युमर असल्याचं सिध्द झाल्यामुळे युवीने उपचार घेण्यासाठी अमेरिका गाठली. सुरुवातील किरकोळ आजार म्हणून युवीने त्याकडे दुर्लक्ष केले. आजाराकडे आपण दुर्लक्ष केलं याची ग्वाही खुद्द युवराजने दिली. मध्यतंरी केमोथेरपीच्या दुसऱ्या डोसात युवीला अशक्तपणा आला होता. पण उपचारासाठी युवीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे असं डॅाक्टरांनी स्पष्ट केलं. याच दरम्यान अनिल कुंबळे याने युवीची हॅास्पिटलमध्ये भेट घेतली. कुंबळेच्या भेटीने युवी भारवावून गेला होता. आज केमोथेरपीची तिसरी आणि अंतिम चाचणी पूर्ण झाल्यामुळे डॅाक्टरांनी युवीला डिश्चार्ज दिला आहे. आता मी आजारातून सुटलो आहे,मी आझाद आहे मी कधी भारतात परततो याची उत्सुक्ता मला लागली आहे. मला पुन्हा एकदा मैदानावर उतरायचं आहे टीमचं प्रतिनिधित्व करायच आहे अशा शब्दात युवीने आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच तमाम चाहत्यांनी जे भरभरून प्रेम केले त्यांचेही युवीने आभार मानले. आता युवी भारतात कधी परतोय याचीच वाट क्रिकेटप्रेमी पाहत आहे.

close