ठाण्यात मनसेचा आघाडीला पाठिंबा

March 19, 2012 12:17 PM0 commentsViews: 9

19 मार्च

ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला बिनर्शत पाठिंबा दिला. मनसेच्या या पाठिंब्यामुळे महायुतीचा 'राज'मार्ग मोकळा झाला पण नाशिकमध्ये मनसेची पाळी आली असता शिवसेनेनं पाठ भिरवली. याचाच बदला घेण्यासाठी अखेर ठाणे महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेनं आघाडीला पाठिंबा दिला आहे. कोकण आयुक्तांकडून आलेल्या पक्षीय बलाबल संदर्भात पालिकेत फॅक्स आला आहे. या मध्ये मनसेनं आघाडीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आज होणार्‍या स्थायी समिती, परिवहन समितीसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. कोकण आयुक्तांकडून पक्षीय बलाबल संदर्भातील कागदपत्रे आली नाही अस कारण देत सभागृह तहकूब करण्यात आलं. मात्र विरोधक अजूनही सभागृहात बसले आहेत. आघाडीकरुन सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे यांच नाव जाहिर करण्यात आलं आहे.

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत आज वेगळचं नाट्य घडलं. मनसेनं आज महायुतीची साथ सोडत आघाडीला जवळ केलं. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढं ढकलावी लागली. ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीत वेगळंच नाट्य घडलं. मनसेनं विरोधी पक्षनेत्याच्या दालनात बसून त्यांचा पाठिंबा आघाडीला जाहीर केला.

स्थायी समितीचे अध्यक्षपद महायुतीकडे जाऊ नये, याची जोरदार मोर्चेबांधणी आज झाली. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याअगोदर महापौरांनी पाठिंब्याच्या आकड्यांची शहानिशी करण्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडीचं प्रकरण आयुक्तांकडं सोपवून निवडणूक पुढं ढकलली.

महापौरपदासाठी मनसेनं पाठिंबा देऊन, त्यांचं नाशिकचं सत्ता समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. पण नाशिकमध्ये शिवसेनेनं त्यांना पाठिंबा दिला नाही, त्याचा वचपा ठाण्याच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनं काढला की काय अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान, महापालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांची निवड झाली.

close