रेल्वे भाडेवाढ मागे घ्याच – ममता

March 19, 2012 9:36 AM0 commentsViews: 2

19 मार्च

रेल्वे प्रवासात भाडेवाढीवरुन तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अखेर रेल्वेमंत्रीपदावरुन दिनेश त्रिवेदींना खाली खेचले. भाववाढीला ममतांनी विरोध कायम ठेवला आहे आणि स्लीपर क्लाससाठी केलेली भाडे मागे घेणारचं असा पवित्रा ममता बॅनजीर्ंनी घेतली आहे. आपल्याचं सरकारच्या रेल्वे बजेटवर टीका करत, आपण भाडेवाढ मागे घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असं ममतांनी स्पष्ट केलंय. ममता बॅनर्जी आणि नियोजित रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मुकूल रॉय यांचा आज संध्याकाळी किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.

close