बुधवारपर्यंत मुख्यमंत्री करा अन्यथा बंड – येडियुरप्पा

March 19, 2012 1:14 PM0 commentsViews: 1

19 मार्च

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाटक सुरू झालं आहे. येत्या 48 तासात आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा नाहीतर बंड करु असा इशारा येडियुरप्पांनी भाजपला दिला आहे. पण भाजप कोणताही निर्णय घाईघाईत किंवा दबावाखाली घेणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय आणि या प्रश्नावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात नेतृत्त्वबदलाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे येडियुरप्पांनी जरा संयम बाळगावा, असा सल्लाही गडकरींनी दिला आहे. येडियुरप्पा आपली नाराजी दर्शवण्यासाठी 40 आमदारांना घेऊन एका रिसोर्टवर जाऊन राहिले. आणि जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सध्याचे मुख्यमंत्री सदानंदा गौडा यांच्याविरुद्ध बंड पुकारण्याचा त्यांनी इशारा दिलाय.

close