टॅक्सीचा प्रवास आजपासून 1 रुपयाने महागला

March 19, 2012 2:32 PM0 commentsViews: 1

19 मार्च

मुंबई टॅक्सीचालकांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आजपासून टॅक्सीच्या प्रवास भाड्यात 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याची घोषणा 13 मार्चला करण्यात आली होती. आजपासून टॅक्सीचं किमान भाडं आता 16 रुपयांवरुन 17 रुपये करण्यात आलं आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. आता टॅक्सी भाडं सुरुवातीला 16 रुपयांवरुन 17 रुपये होईल, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहेत. टॅक्सी असोसिएशनं 20 रुपये भाडेवाढ मागितली होती. पण सरकारने फक्त एक रुपये भाडे वाढ दिल्याचे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोस यांनी सांगितलं आहे.

close