वडार समाजाचं आंदोलन मागे

March 19, 2012 9:50 AM0 commentsViews: 99

19 मार्च

वडार समाजाचं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडार सामाजाच्या प्रश्नांवर आता 26 मार्चला मंत्रालयात बैठक होणार आहे. दरम्यान, आज सकाळी वडार समाजाचा मोर्चा तळेगाव दाभाडेहून निघाला. आंदोलकांतर्फे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण मात्र पोलिसांनी तो मोर्चा वडगाव मावळ फाट्याजवळ अडवला. त्यामुळे तिथेचं आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं. वडार समाजातील जवळपास दोन ते अडीच हजार जण सहभागी झाले आहेत. वडार समाजाला एसटी/एससी आरक्षण लागू करावे याचप्रमाणे महसूल आणि वन विभागाच्या हद्दीतल्या दगड खाणींमध्ये वडारी लोकांना कामाची संधी अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढला गेला. या मोर्च्याचं नेतृत्व नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केलंय.

close