सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

March 19, 2012 12:16 PM0 commentsViews: 1

19 मार्च

घरकुल घोटाळा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असणारे शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांची पोलीस कोठडी आज संपली आहे. दरम्यान, सुरेश जैन यांना 30 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आणखी 2 दिवस पोलीस कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली. सुरेश जैन यांना अमळनेर कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या सुनावणीसाठी जळगांवचे अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन आर क्षीरसागर अमळनेरला पोहोचले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने हा निकाल दिला.प् ाोलिसांच्या विनंतीमुळे कोर्टाची जागा बदलण्यात आली. दरम्यान, सुरेशदादा जैन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून येत्या 21 तारखेला या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 29 कोटींचा घरकूल घोटाळा झाल्याची फिर्याद तत्कालिन पालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी 2006 ला दिली होती. मूळ फिर्यादीत सुरेश दादा जैन यांचं आरोपी म्हणून नाव नसताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

close