सदा सरवणकरांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश

March 19, 2012 6:05 PM0 commentsViews:

19 मार्च

काँग्रेस नेते सदा सरवणकर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सरवणकर पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील. 2009 साली मुंबईतल्या माहीम भागातून विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने सरवणकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सरवणकर यांनादादरची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

close