राजू शेट्टींचे आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित

March 20, 2012 9:42 AM0 commentsViews: 3

20 मार्च

कांदा प्रश्नावरुन कालपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकमध्ये आंदोलन सुरु केलं होतं. ते आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावरुन आज विधानसभेत निवेदन केलं. त्यानंतर राजू शेट्टींनी पुढचे आठ दिवस हे आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. उद्या पणनमंत्र्यांच्या उपस्थित कांदा निर्यातदारांची बैठक घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. शिवाय कांद्यावरील किमान निर्यात मूल्य कमी करण्यासंदर्भात प्रयत्न करु असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

close