गिरणी कामगारांचे ठिय्या आंदोलन

March 20, 2012 9:50 AM0 commentsViews: 1

20 मार्च

गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांची किंमत राज्य सरकारने सोमवारी विधानसभेत जाहीर केली. गिरणी कामगारांना आठ लाख 64 हजार रुपयांमध्ये लॉटरी पद्धतीनं घरांचं वाटप करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी विधानसभेत केली. आज याविरोधात गिरणी कामगार ठिय्या आंदोलन केले. गिरणी कामगारांच्या 9 संघटना आझाद मैदानात होणार्‍या या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला साडे तीन वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. दरम्यान,अधिवेशनातही याच मुद्यावर सध्या चर्चा सुरू आहे.

close