चवदार तळे सत्याग्रहाला आज 85 वर्ष पूर्ण

March 20, 2012 11:15 AM0 commentsViews: 62

20 मार्च

20 मार्च 1927 ला चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होऊ असे नाही. पाणी हा प्रत्येक सजीवाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक सजीवाने मान्य करायलाच हवा, अशी समतेची भूमिका घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह केले. आज या सत्याग्रहाला 85 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने आज महाडला हजारो आंबेडकरी अनुयायी दाखल झाले आहे. महाडला अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. चवदार तळ्याचं पाणी प्राशन करुन भीमसैनिक आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करतात. 20 मार्च 1927 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचं पाणी दलितांना मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. यावेळी बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात(नाशिक) प्रवेश केला होता या दोन सत्याग्रहानंतर देशात खर्‍या अर्थानं सामाजिक चळवळ सुरु झाली होती.

close