कोल्हापूर पालिकेत युतीच्या नगरसेवकांचा गोंधळ

March 20, 2012 11:13 AM0 commentsViews:

20 मार्च

पाणी पुरवठा आणि ई गर्व्हनन्सच्या मुद्यावरुन कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. सभेच्या सुरवातीलाच शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक पाणी प्रश्नावरुन आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी महापौर आणि आयुक्तांच्या टेबलकडे धाव घेवून त्यांना धारेवर धरलं. यावेळी सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगरसेवकांनी सभात्याग केला.

close