मुंबईचे पाणी महागले

March 20, 2012 5:39 PM0 commentsViews: 3

20 मार्च

देशाचे आर्थिक बजेट सादर होऊन मुंबईकरांची महिन्याच्या हिशेबाची बेरीज-वजाबाकी पूर्ण होत नाही तोच मुंबईकरांचा खिसा खाली झाला आहे. आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आयुक्तांनी स्थायी समितीकडे 2012-13 साठी 26 हजार 581 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षींपेक्षा 26 टक्याने अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. पाणी पट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी 1 हजार लिटरमागे 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हौसिंग सोसायटी साठी दर 1 हाजर लिटरमागे 50 पैसे वाढवण्यात आले आहे.

तर दुसरीकडे व्यावसायिकांवरही पाणी फिरवले आहे. यापुढे व्यावसासिक वापरासाठी दर वर्गीकरूण करुन वाटले आहे. यामध्ये बिगर व्यावसायिक संस्थेसाठी दर 1 हजार लिटरला 3.50 रुपयांची ,संस्थांसाठी दर 1 हजार लिटरला 12 रुपये, उद्योग आणि कारखाने यासाठी दर 1 हजारे लिटरला 15 रुपये, तारांकीत हॉटेलसाठी दर 1 हजार लिटरमागे 22 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावित वाढीमुळे 313.40 कोटी रुपये महसूल वाढेल. सध्या 816.41 कोटी रुपये महसूल मिळतो. प्रस्तावित वाढीमुळे 1129.81 महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

close