एटीएसचे आरोप संघाला मान्य नाही

November 22, 2008 2:57 PM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर मालेगावमालेगाव स्फोटातल्या आरोपींनी वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं इन्कार केला आहे. लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि शंकराचार्य स्वामी अमृतानंद उर्फ दयानंद पांडे यांनी आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांचा हत्येचा कट रचला अशी माहिती एटीएसनं दिली होती.मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचं केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप संघाचे नेते मदनदास देवी यांनी केला. संघाचा शांततेवर विश्वास असून हिंसा आम्हाला मान्य नाही असंही ते म्हणाले. संघ नेत्यांच्या हत्येचा कट असेल तर तो प्रसारमाध्यमांमधून का सांगण्यात आलं असा सवालही त्यांनी केला.

close