उत्तरप्रदेशमध्ये जीप रेल्वेवर धडकली, 15 ठार

March 20, 2012 11:28 AM0 commentsViews: 2

20 मार्च

उत्तर प्रदेशमध्ये सकाळी झालेल्या रेल्वे आणि जीप अपघातात 15 जण मृत्यमुखी पडलेत तर दोन जण जखमी झाले आहे. हाथरस जवळ निर्मनुष्य रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला. दिल्ली- कोलकात्ता रेल्वे मार्गावरील या फाटकाजवळ प्रवाशी जीप भरधाव वेगात ट्रेनवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यामुळे जीप 100 फूट दूर फेकली गेली. या जीपमध्ये 17 प्रवासी होते. यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत रेल्वेने जाहीर केली आहे.

close