आशियाई कपमध्ये भारताचा ‘पत्ता कट’

March 20, 2012 5:50 PM0 commentsViews:

20 मार्च

आशियाई कपमधून टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात आले आहे. आज शेवटच्या लीग मॅचमध्ये बांगलादेशने लंकेचा पाच विकेटनं दणदणीत पराभव केला. आजच्या मॅचवर भारतीय टीमचा फायनल प्रवेश अवलंबून होता. पण आता टीम इंडियाचा फायनलमधून पत्ता कट झाला. भारत आणि बांगलादेश यांचे पॉईंट्स जरी समान असले तरी त्यांच्यातील मॅच विजेता फायनल मध्ये जाणार होता. आणि या निकषावर बांगलादेशने फायनलमध्ये प्रवेश केला.

आजच्या मॅचमध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या लंकेने बांगलादेशसमोर विजयासाठी 233 रन्सचं टार्गेट ठेवलं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ ल्युईस नियम वापरला गेला आणि हे टार्गेट 40 ओव्हर्समध्ये 212 केलं गेलं. बांगलादेशतर्फे तामिम इक्बालने 59 तर शाकिब अल हसननं 56 रन्स केले. त्याचबरोबर नासीर हुसेननं 6 तर मोहमदुल्लानं 32 रन्स करत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close