नवी मुंबईत रिक्षाचालकांचा बेमुदत संप

March 20, 2012 11:41 AM0 commentsViews: 30

20 मार्च

रोजच्या प्रमाणे सकाळी घाई-घाईने ऑफिसकडे निघालेल्या नवीमुंबईकरांना रिक्षा चालकांनी अचानक पुकारलेला बंदामुळे फटका बसला. कारण नवी मुंबईतील रिक्षाचालक आज सकाळपासून बेमुदत संपावर गेले आहेत. रिक्षा भाड्यात चार रुपयांची कपात करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे. पण या संपात शिवसेनेची महाराष्ट्र रिक्षाचालक सेना सहभागी झालेली नाही. पण 60 टक्के रिक्षा बंद असल्याने नवी मुंबईकरांचे हाल होत आहे. अचानक पुकारलेल्या या संपामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

close