‘एजंट विनोद’ला पाकमध्ये बंदी

March 20, 2012 5:57 PM0 commentsViews: 5

20 मार्च

येत्या शुक्रवारी सैफ अली खानचा 'एजंट विनोद' हा सिनेमा रिलीज होतोय. पण या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घातली गेली आहे. सिनेमात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा संदर्भ आहे म्हणून पाकिस्तानाने सिनेमावर बंदी घातली. श्रीराम राघवनचं दिग्दर्शन असलेला एजंट विनोद भारतीय गुप्तहेराभोवती फिरतो. सैफने ती भूमिका साकारली आहे. सैफचंच प्रॉडक्शन असलेल्या या ऍक्शनपटात करिना कपूर ऍक्शन करताना दिसणार आहे.

close