औरंगाबादमध्ये मनसेचा आघाडीशी घरोबा

March 21, 2012 9:00 AM0 commentsViews: 3

21 मार्च

औरंगाबाद जिल्हा परिषदेत अखेर मनसेनं आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये अध्यक्षपद हे काँग्रेसकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असेल. काँग्रेसच्या नाहीदा बानू पटे या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मुख्य दावेदार मानल्या जात आहे. तर मनसेला बांधकाम आणि शिक्षण सभापतीपद मिळणार आहे. ठाण्यात मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर औरंगाबाद जि.प.मध्ये मनसे शिवसेनेला पाठिंबा देईल अशी चर्चा होती. पण मनसेनं आघाडीला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षीय बलाबलआघाडी- 26युती- 23मनसे- 8अपक्ष (राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत)- 3सत्तास्थापनेसाठी लागणार 31 सदस्य

close