अधिवेशनात सरकार-विरोधकांमध्ये हमरीतुमरी

March 20, 2012 12:17 PM0 commentsViews: 5

20 मार्च

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. लातूरमधील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान पाच जणांना अंधत्व आलं होतं. हे प्रकरण आज विधानसभेत चांगलंच गाजलं. प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित उत्तर देत असताना शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर आणि रवींद्र वायकर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरीतुमरी आणि शिवीगाळही झाली. याप्रकरणी विधानसभा दोनवेळा तहकूब करावी लागली. अखेर विजय कुमार गावित यांनी सभागृहाची माफी मागितली. तसेच या प्रकरणी पूर्ण अंधत्व आलेल्याना 1 लाख रुपयांची मदत तर अशंत: अंधत्व आलेल्याना 50 हजारांची रुपयांची मदत सरकराने जाहीर केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

close