‘गिरणी कामगारांना मोफत घरं नाहीच’

March 20, 2012 12:51 PM0 commentsViews: 7

20 मार्च

गेल्या 30 वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढणार्‍या गिरणी कामगारांच्या हाती आजही आश्वसनच पडली. पण गिरणी कामगारांना मोफत घर देण्यास सरकारने नकार दिला आहे. आज गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्नावर कामगारांचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये चर्चा झाली. अर्ज भरलेल्या 1 लाख 48 हजार गिरणी कामगारांना घरं कशी उपलब्ध होतील आणि त्यासाठी जमिनीचे कुठकुठले पर्याय उपलब्ध आहेत याबाबतचा सुस्पष्ट प्रस्ताव दोन महिन्यांत सादर करणार आहे. तसेच घरांच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी कमी दराने कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन सरकारने गिरणी कामगारांना दिलं. तर गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी 7 दिवसात निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं त्याचबरोबर स्वांतत्र्यसैनिक गिरणी कामगारांना लॉटरी शिवाय घरं देणार असंही सरकारनं जाहीर केलं आहे.

close