अखेर मुकुल रॉय रेल्वेमंत्रीपदी विराजमान

March 20, 2012 1:00 PM0 commentsViews: 3

20 मार्च

ममतांच्या रेड सिग्नलमुळे दिनेश त्रिवेदींना पदावरुन पाय उतार व्हावे लागले. आणि आज अखेर तृणमूल काँग्रेसचे मुकुल रॉय यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुकुल रॉय नवे रेल्वेमंत्री झाले आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या एका छोटेखानी समारंभात ही शपथ देण्यात आली. दिनेश त्रिवेदी यांना हटवून रॉय यांना रेल्वेमंत्री करण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनी केली होती.

पंतप्रधानांनी ममता बॅनर्जीसोबत 20 मिनिटं झालेल्या चर्चेनंतर मुकुल रॉय यांचं नाव नवे रेल्वेमंत्री म्हणून स्विकारलं. त्यानुसार रॉय हे आता रेल्वेमंत्री झाले. दरम्यान, रॉय यांच्या शपथविधी समारंभाला ममता बॅनर्जी आणि दिनेश त्रिवेदी मात्र उपस्थित नव्हते. रॉय हे सध्या जहाज उद्योग खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. पण आता रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेला मुकुल रॉय हेच उत्तर देणार आहेत. मात्र भाडेवाढ मागे घेण्याच्या निर्णयावर आपण संसदेतच उत्तर देणार असल्याचं मुकुल रॉय यांनी म्हटलं आहे.

close