राज्यसभेची निवडणूक बिनविरोध ; काकडेंची माघार

March 20, 2012 4:25 PM0 commentsViews: 3

20 मार्च

राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. पुण्यातील सुप्रसिध्द उद्योगपती आणि अपक्ष उमेदवार संजय काकडे हे आज शरद पवार यांना भेटले. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून राजीव शुक्ल आणि विलासराव देशमुख, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि गोविंदराव आदिक, भाजपकडून अजय संचेती आणि शिवसेनेकडून अनिल देसाई यांची निवड आता निश्चित आहे.

close