पुन्हा एकदा भाजपच्या आमदारांचा ‘डर्टी पिक्चर-पार्ट २’

March 21, 2012 10:23 AM0 commentsViews: 2

21 मार्च

कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही भाजपचे 2 आमदार विधानसभेतच अश्लील व्हिडिओ पाहताना पकडले गेले आहेत. सभागृहाचं कामकाज सुरू असतानाच भाजपचे आमदार शंकर चौधरी आणि जेठा धारवाड आपल्या आय-पॅडवर अश्लील व्हिडिओ पाहत होते. त्यांचं हे कृत्य आपल्या मोबाईल कॅमेर्‍यावर शूट केल्याचा दावा एका गुजराती वर्तमानपत्राच्या पत्रकाराने केला आहे. या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी अशी मागणी करत काँग्रेसच्या आमदारांनी गदारोळ घातला. गुजरात सरकारने या घटनेच्या संसदीय चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच आयपॅड फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपच्या तीन आमदारांना अशाच प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता.

close