‘आदर्श’ नेत्यांवर कारवाई कधी होणार ?

March 20, 2012 5:25 PM0 commentsViews: 11

आशिष जाधव, मुंबई

20 मार्च

आदर्श घोटाळ्यातल्या आरोपींच्या यादीत अशोक चव्हाण यांच्याप्रमाणेच विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे यांच्याही नावांचा समावेश करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सीबीआयने वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चौदा जणांना आरोपी केलं. या घोटाळ्याला विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेही जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

'आदर्श' मुख्यमंत्रीअशोक चव्हाणांनी आदर्शच्या भूखंडाला मंजुरी मिळवून देण्यात, सोसायटीमध्ये नागरी सदस्यांसाठी परवानगी मिळवण्यात, रिक्रीएशन ग्राऊंडची जागा आदर्श सोसायटीला देण्यात आणि आदर्शला एमएमआरडीएचं आक्युपन्सी सर्टिफिकेट देण्यात भूमिका होती.

विलासरावांच्या काळात नगरविकास खात्यानं आदर्श सोसायटीला दोन महत्वाच्या परवानग्या दिल्या आणि बॅकबे बेस्ट डेपोचा आरक्षित भूखंडाचं आदर्शला हस्तांतरित करण्यात आला शेवटी आदर्शसमोरच्या प्रकाश पेठे मार्गाची रूंदी कमी करण्यात आली.

तर सुशीलकुमार शिंदेंच्या काळात आदर्श सोसायटीला जमीन वाटपपत्र जारी झालं आणि आदर्शच्या वाढीव 51 नागरी सदस्यांच्या फ्लॅट वितरणाला मंजुरी मिळालीआदर्श प्रकरणी राज्यसरकारने स्वत:हून कारवाई करण्याचं टाळलंय. आदर्शमधल्या प्रशासकीय अनियमिततांवर न्यायालयीन आयोगाचा अंतरिम अहवाल या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार सादर करणार आहे. त्यात या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराविषयी काय टीका टिप्पणी केली जाते याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close