ठाणे जि.परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

March 21, 2012 12:10 PM0 commentsViews: 3

21 मार्च

ठाण्यात महापौरांच्या निवडणुकीची संधी हुकल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेतही आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असं स्पष्ट झालंय. आघाडीला बहुमतासाठी 6 जागांची गरज होती आणि त्यांंना डावे पक्ष आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिल्याने त्यांचं संख्याबळ आता 35 वर गेलं आहे. त्यामुळे आता मनसेच्या पाठिंब्याची आघाडीला गरज उरलेली नाही. पण आता मनसे आणि विवेक पंडित यांची वसई विकास आघाडी शिवसेनेला पाठिंबा देणार की आघाडीला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पक्षीय बलाबलबहुमताचा आकडा- 34आघाडी – 28राष्ट्रवादी – 27काँग्रेस – 01आघाडीला पाठिंबाडावे पक्ष-04बहुजन विकास आघाडी- 3युती- 26शिवसेना- 15भाजप-11यांची भूमिका?मनसे-02लोकहितवादी पार्टी- 03

close