रिक्षाचालकांच्या संपामुळे नवी मुंबईकरांचे हाल

March 21, 2012 12:47 PM0 commentsViews: 4

21 मार्च

नवी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे. भाडेकपातीच्या निर्णयाविरुध्द रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नवी मुंबईकर मात्र हैराण झाले आहे. रिक्षाचालकांचा संप मोडीत काढण्यासाठी आता रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनवर मोफत गाड्या उपलब्ध करुन दिल्यात. वाशी स्थानकावरुन कौपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, नेरुळ भागात जाणार्‍या प्रवाशांना रिपाइं कार्यकर्ते आज आपल्या गाडीतून सोडत होते.

close