थोरल्या भावानेच अगोदर धोका दिला – पिचड

March 22, 2012 5:21 PM0 commentsViews: 5

22 मार्च

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद वाढतच चाललाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार होती. पण काँग्रेसमनंच धोका दिला. अशा शब्दात राष्ट्रवादीने काँग्रेसला उत्तर दिलंय. थोरल्या भावानंचं आधी चुका करायला सुरुवात केली अशा शब्दात राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी काँग्रेसला टोला लगावला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला.आणि त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीवर दगा दिल्याचा आरोप केला होता. एव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रवादीची तक्रार केली आहे.

close