मुंबई झाली ‘धूळ’मय

March 21, 2012 6:13 PM0 commentsViews: 4

21 मार्च

मुंबई सर्वत्र धूळ मिशि्रत वातावरण झालं आहे. थंडीत रस्त्यांवर धुक येतात त्यामुळे वाहन, इमारती दिसत नाही अशी परिस्थिती मुंबईत उद्भवली आहे. सगळीकडे धूळ आणि धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. मुंबईत पहिल्यांदाचा असा अनुभव आल्यामुळे मुंबईकरांना आश्चर्य वाटत आहे. राजस्थानसह उत्तर भारतात निर्माण झालेलं वातावरण हे यामागचं कारण असल्याचं पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी म्हटलं आहे. असं वातावरण आणखी दोन ते दिवस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

close