येडियुरप्पा पुन्हा एकदा मुख्यमंत्री ?

March 21, 2012 6:17 PM0 commentsViews: 1

21 मार्च

कर्नाटकमध्ये ंनेतृत्वबदलाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बी. एस येडियुरप्पा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. कर्नाटकातल्या चिकमंगळूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला दणकून पराभव झाला. 2009 मध्ये सदानंदा गौडा याच मतदारसंघातून निवडून आले होते काँग्रेसच्या उमेदवाराने इथे तब्बल 40 हजार मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. या पराभवानंतर कर्नाटकचे नेतृत्व पुन्हा येडियुरप्पा यांच्याकडेच यायला हवं, अशी मागणी आता समर्थकांनी लावून धरली. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत आता याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.

close