मराठी वर्षाच्या स्वागतासाठी साकारली महारांगोळी

March 22, 2012 2:20 PM0 commentsViews: 81

22 मार्च

गुढीपाडव्यातील स्वागत यात्रा आणि रांगोळी यांचं नातं तसं जुनंच आहे. अंबरनाथमध्ये तर याच गुढीपाडव्याचं औचित्य साधून दोन दिवस आधीच तब्बल आठ हजार स्क्वेअर फुटाची महारांगोळी काढण्यात आली आहे. पंचवीस महीलांनी जवळपास 14 तासांत ही रांगोळी पूर्ण केली. 500 किलो रांगोळीचा वापर करुन ही रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी या महिलांना एक महिन्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अंबरनाथ मधल्या समन्वय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही महारांगोळी साकारण्यात आली.

close