रेल्वे प्रवासी भाडेवाढ मागे

March 22, 2012 9:16 AM0 commentsViews: 11

22 मार्च

नवे रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांनी रेल्वेची प्रस्तावित दरवाढ अखेर मागे घेतली. त्यासंदर्भात नव्या रेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये प्रस्तावित केलेली भाडेवाढ मागे घेण्यासंदर्भातला ठराव लोकसभेत मांडला. त्यावर आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर करण्यात आला. लोकप्रिय असा निर्णय घेऊन तृणमुलनं सामान्य जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केलाय. पण यामुळे रेल्वेला मोठा फटका बसणार आहे.

अपेक्षेपमाणे रेल्वे दरवाढ मागे घेण्यात आली. ममता बॅनजीर्ंची पसंती असलेले नवे रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांनी मंत्रीपदाचा कारभार सांभाळताच रेल्वे तिकीटांची दरवाढ मागे घेतली. पण तब्बल दशकभरानंतर ज्यांनी ही दरवाढ सुचवली होती, त्यांनी मात्र आपला निर्णय योग्यच असल्याचं म्हटलंय.दिनेश त्रिवेदी म्हणतात, आधुनिकीकरणासाठी तुम्हाला पैसा हवाच. मी हेच बजेट सादर केलं असतं.

रेल्वे दरवाढ मागे घेण्याच्या निर्णयाला तृणमुलच्याच काही नेत्यांनी विरोध केलाय. दरवाढ मागे घेतल्यामुळे रेल्वेचंही मोठं नुकसान होणार आहे.

तिकीट दरवाढीमुळे 2012-13 या वर्षात जवळपास 5 हजार कोटी उभारण्याचा रेल्वेचा विचार होता. पण एसी फर्स्ट आणि एसी टू टियरवगळता इतर सर्व दरवाढ मागे घेतल्यामुळे रेल्वेला फक्त 300 ते 400 कोटी उभारता येतील. म्हणजे जवळपास चार हजार सहाशे कोटींचं नुकसान. एकट्या पॅसेंजर सेवेमुळे रेल्वेचं 20 हजार कोटींचं नुकसान होतं. 800 कोटी रुपए सवलतींच्या रुपात खर्च होतात. पॅसेंजर सेवेतून रेल्वेला 30 टक्के महसूल मिळतो. पण याच सेवेसाठी रेल्वेच्या एकूण उत्पन्नाच्या दोन तृतियांश खर्च होतो.

रेल्वेचा नेहमीच राजकीय फायद्यासाठी होत आला आहे. आणि यावेळीही स्वस्त राजकीय फायद्यासाठी सुधारणेचा बळी देण्यात आला, असंच म्हणावं लागेल.

रेल्वे भाडेवाढ मागे (प्रति किमी)

सेकंड क्लास – 3 पैसे स्लीपर क्लास – 5 पैसेथ्री टियर एसी – 10 पैसे एसी चेअर कार – 10 पैसे

या क्लासची भाडेवाढ कायम

एसी फर्स्ट क्लास- 30 पैसे (प्रति किमी)टू टियर एसी- 15 पैसे (प्रति किमी)

close