पंडित यादवराज फड यांचा जाहीर सत्कार

March 22, 2012 3:36 PM0 commentsViews: 7

22 मार्च

पुण्यात अनोख्या स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित यादवराज फड यांना त्यांच्या शिष्यांनी गुरूदक्षिणा दिली. किराणा गायकीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना रौप्यकलश आणि 3 लाख रुपयांची रक्कम गुरुदक्षिणा म्हणून देण्यात आली. उस्ताद उस्मान खान आणि पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते फड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. फड यांच्या वारकरी संगीतातल्या योगदानाचंही उस्ताद उस्मान खान यांनी यावेळी कौतुक केले. फड यांच्या विष्णूमय या डीव्हीडी आणि स्वरोत्सव या गौरवांकाचंही प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ, फांऊटन म्युझिकचे कांतिलाल शहा, गौरव समितीचे अध्यक्ष संजय बालवडकर, शांताराम इंगवले, सदानंद बोरसे, सुलभा तेरणीकर उपस्थित होते.

close