नवी मुंबईत रिक्षा चालकांच्या संपामुळे नागरीक हैराण

March 22, 2012 4:12 PM0 commentsViews: 6

22 मार्च

नवी मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. भाडेकपातीच्या निर्णयाविरुध्द रिक्षा चालकांनी रिक्षा बेमुदत बंद पुकारला आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नवी मुंबईकर मात्र हैराण झाले आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी काल रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी काल वाशी रेल्वे स्टेशनवर मोफत गाड्या उपलब्ध करुन दिल्या होत्या. पण अजूनही हा संप सुरूच आहे. वाशी स्थानकावरुन कौपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, नेरुळ भागात जाणार्‍या प्रवाशांना रिपाइं कार्यकर्ते आज चक्क आपल्या गाडीतून सोडले.

close