पाकिस्तान ठरली ‘आशिया किंग’

March 22, 2012 4:58 PM0 commentsViews: 3

22 मार्च

अटीतटीच्या लढतीत पाकिस्तान क्रिकेट टीम आशिया किंगची मानकरी ठरली आहे. आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने बांगलादेशचा 2 रन्सनं पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या पाकिस्तानने विजयासाठी 237 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तामिम इक्बाल आणि शाकिब अल हसननं विजयाच्या आशा वाढवल्या. पण त्यांना इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही आणि बांगलादेशला 8 विकेट गमावत 234 रन्स करता आले. शेवटच्या बॉलपर्यंत विजयाची मदार बांगलादेशकडे होती पण पाकच्या भेदक बॉलिंगपुढे बांगलाला हार मानावी लागली.

close