येडियुरप्पांचे बंड झाले थंड ; पुढच्या महिन्यात मुख्यमंत्रीपद ?

March 22, 2012 5:18 PM0 commentsViews: 2

22 मार्च

बी. एस. येडियुरप्पा पुढच्या महिन्यात पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी आयबीएन-नेटवर्कला ही माहिती दिली. येडियुरप्पा यांनी आज पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. आणि पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत आश्वासन मिळवल्याचं समजतंय. त्यांनी गडकरींना 67 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रही दिलं. आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन पक्षनेतृत्वाने दिल्याचे येडियुरप्पांनी सांगितलंय. गडकरींकडून आश्वासन मिळाल्यानंतर सध्या बंड थांबवण्याचा निर्णय येडियुरप्पांनी घेतला आहे.

close