माळढोक अभयारण्यात भीषण आग

March 23, 2012 11:24 AM0 commentsViews: 2

23 मार्चसोलापूरमधील नान्नजच्या माळढोक पक्षी अभयारण्यात भीषण आग लागली आहे. या वणव्यात वनक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी आग लागलीय ते क्षेत्र वन्य पशुपक्षांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेलं आहे. गावकर्‍यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण सरकारकडून काहीच प्रयत्न झाले नाही, असा आरोप गावकरी करत आहे.

close